होळी “फाग” बोली भाषेत पुढील प्रमाणे..

(फाग)
होळी किंवा हुताशनी पोर्णिमा वसंत ऋतू


या महिन्यात होळी सण साजरा केला जातो.
वसंत पंचमी पासून ९ दिवस कोकणात छोटी(लटकी )होळी व नंतर दहाव्या दिवशी मोठी होळी साजरी केली जाते.त्याला होम म्हणतात.

कोकणात हा उत्सव साजरा करताना होलिका दहन करण्याआधी “फाग” (होळी पारंपरिक गीत) म्हटले जाते.
आणि होळी भोवती फिरत प्रदक्षिणा केल्या जातात.


उत्तर भारतात देखील या महिन्यात काही गीते कविता रचल्या व गायल्या जातात त्यांना
“फगुआ” किंवा “फाल्गुनी” म्हणले जाते.
परंतु माझं गाव( पाने गाव ) कोकण रायगड येथे म्हणले जाणारे होळी पारंपरिक समूह गीत “फाग” तिथल्या बोली भाषेत पुढील प्रमाणे..

फाग:

कळकीच्या बेटी एक कोंब जन्मला,
वाकडा तिकडा गगनी गेला.
सोन्याच्या सुरीने बेटी (देठि) उतरीला.
तोही कोंब गेला लोहाराघरी,
लोहारदादानं लोहपांन केला.
तोही कोंब गेला सोनाराघरी,
सोनारदादनं सोन्यां मढविला.
तोही कोंब गेला सुताराघरी,
सुतारदादानं पालखी जोडीला.
त्या या पालखीत कोण देव बसं?
त्या या पालखीत भैरीबा बसं.
त्या या पालखीत कोण देव बसं?
त्या या पालखीत पानकरीण बसं. ( पानेश्वरी – गावदेवी )
त्या या पालखीत कोण देव बसं?
त्या या पालखीत सोमजाई बसं.
त्या या पालखीत कोण देव बसं?
त्या या पालखीत जननी बसं.
त्या या पालखीत कोण देव बसं?
त्या या पालखीत वरदाईनी बसं.
त्या पालखीत कोण देव बसं?
त्या या पालखीत सर्व देव बसं.

मग होळीची पूजा करून अग्नी देत प्रज्वलित केले जाते आणि अशा बागां(आरोळ्या) दिल्या जातात.

कांग रं कांग आमच्या देवाला सोन्याचा भांग रं..
होम रं होम आमच्या भौरीबाला सोन्याचा कोंब रं…
होली रं होली आमच्या पानकरणीला सोन्याची सरी रं..

नंतर तोंडावर मनगटाने मारत
बोम्बा मारल्या जातात..

आ ब ब ब….

ही माहिती कशी वाटली नक्की कळवा,आवडली असेल तर इतरांना पाठवा..

  • करण दानावले
Share Anywhere
readright.in
readright.in
Articles: 214

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *