प्रभु श्रीरामचंद्रांची प्रतिमा आणि वाद्यांच्या गजरात, रामजन्मभूमी आयोध्येच्या राममंदिरातील गर्भगृहात पूजन केल्या गेलेल्या मंगलाक्षता कलशांचे पुण्यामधे उत्साहात स्वागत होतं आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने २४ कलशांतील अक्षता पश्चिम महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यापूर्वी पुण्यातून प्रत्येक घरोघरी त्याचं मोठं जल्लोषात स्वागत होतं आहे.काल मंगल कलश अक्षता आल्या, सगळ्या गल्लीबोळातुन रांंगोळ्या काढल्या होत्या, जसे काही दिवाळी साजरी होते आहे,
आधी कळलेचं नाही की, काय कार्यक्रम आहे? पण संध्याकाळी राम घोष ऐकू येऊ लागला, खूप उत्साह, जल्लोष, रामनामाचा गजर, आणि मंगल कलश घेऊन निघालेली पालखी.. अंगावर रोमांच उभे राहिले, डोळे अचानक दाटून आले, आवाज कापरा झाला, जयघोष करताना तो कापरा आवाज फूटला नाही.


मित्रांनो अस का झालं? याचा विचार केला, तेव्हा एक विचार मनातून चटकन वाहत गेला, तो आयोध्याचा राजा… ज्याच्याबद्दल किती राजकारणं, किती कुटनीति, किती मतभेद, न्यायालये झाली .आमच्या पिढीला त्यामधलं एवढं कळलंही नसेल, कदाचित,
राम हा एक कथेतला राजा झाला असेल आमच्या पिढीसाठी..पण नक्कीच, ही आपल्या कुठेतरी विसरत चाललेल्या इतिहासाला उजळा देणारी घटना आहे. आपला दैदिप्यमान इतिहास आणि सांस्कृती तिच्या मूळ रूपात, आणि शानेसह जगासमोर येत आहे.
एवढे झगडे, एवढा वेळ, आणि एवढ्या बहुमतामुळे हे शक्य झालं.. असं वरकरणी आपण म्हणू शकतो, पण “त्या” देवाचीच ती इच्छा,, तो राजा आज आपल्या भारतवर्षाला पहायला पुन्हा प्रत्येक गल्लीबोळातून ,रस्त्या- रस्त्या वरून त्याच्या राजेशाही थाटात ,लोकांनी केलेला वर्षाव स्वीकारत चाल्लाय!…पुन्हा त्याच्या आयोध्येत त्याच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी!!
मंदिर उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना या गोष्टीची पूर्ण जाणिव आहे कि ,या देवकार्यासाठी आपण सर्व, प्रत्येक भारतवासी कटिबद्ध आहोत आणि प्रत्येक जण त्या पुण्यक्षेत्री जाऊ शकत नाही, पण प्रत्येकाला मंगलकलशाचे दर्शन घेता येणार. आपल्याला एक करणारी केवढी अफाट गोष्ट आहे ही!
मला ती सेतुबंधाच्या वेळची कथा आठवते, प्रत्येक जण मग त्या महाकाय मारुतीपासून ते त्या छोट्या खारीच्या सहभागापर्यंत हे सर्व “योगदान” ठरते.. प्रत्येक भारतीयाला जोडणारे हे पर्व ठरेल.
आता आपला देव फक्त कथेत नाही.. तर आपल्या घराघरातून येऊ गेला.. आपल्या सादिच्छा, आणि प्रेम घेऊन,
आणि सगळ्या खऱ्याखोट्याचा निवाडा करणारा रामराजा.. आता विराजमान होणार आहे.. राजदंड घेऊन.. जिथे अपराध्याला फक्त शिक्षा नाही तर त्याचे मनोपरिवर्तन होऊन चागली प्रजा तयार होईल, आपल्या मनामनातुन पुन्हा एक भावना जागी राहील.. की.. माझ्याकडे माझा देव पाहत आहे.. मंगल अक्षता कलशाला खूप सादिच्छा..
मित्रांनो, तो शुभ दिवस, ज्याची कित्येक वर्षांपासून आपण आतुरतेने वाट बघत आहोत, तो दिवस आहे, 22 जानेवारी 2024, तिथी कार्तिक कृष्ण द्वादशी, त्रयोदशी,! भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्या येथील नवीन मंदिरात होणार आहे.